एस. एस.सी बोर्डाच्या परीक्षेत सलग तेराव्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाने फेब्रुवारी मार्च या शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गौरीशंकर च्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल (भक्तवडी) सातारारोड मधील विद्यार्थ्यांनी सलग तेराव्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखत स्कूलच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देऊन त्यांना सक्षम घडवणाऱ्या या स्कूलने प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. यामध्ये श्रेया महेश सकुंडे हिने ८४.६०% गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तर शिवांजली रणजित फाळके हिने ८२.४०% व मिजान शमीर भालदार यांनी ८०% गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा स्कूलच्या प्राचार्या सविता नलवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, अप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, यांनी अभिनंदन केले
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




