सातारा गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई

४ किलो गांजासह  दोन तस्कर गजाआड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Marijuana trafficking, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्यात अवैद्य व बेकायदेशीर रित्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखा  सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने २९ मे रोजी धुळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत संयुक्तपणे मोठा छापा टाकला . या धडक कारवाईत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन सराईत गांजा तस्करांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक बजाज प्लॅटिना मोटार सायकल आणि २ मोबाईल असा एकूण २,०१,७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अजित राजेंद्र कस्तुरे (वय ३१, रा. माळखांबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आदित्य रामचंद्र आतार (वय २५, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


 पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना एलसीबीचे पोलीस निरीक्षक  विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो.उ.नि. परितोष दातीर यांचे पथक फलटण परिसरात गोपनीय माहिती गोळा करत होते. २९ मे रोजी फलटण येथे कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू असताना, सोलापूरचे दोन इसम प्लॅटिना दुचाकीवरून (क्र. MH 12 HX 2649) धुळदेव गावच्या हद्दीत रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची  खबऱ्या मार्फत माहिती मिळाली.


माहिती मिळताच एलसीबीचे पो.नि. विश्वजीत घोडके, फलटण शहरचे पो.नि. अरविंद काळे आणि स.पो.नि. मिठू जगदाळे यांच्या संयुक्त पथकाने रावरामोशी पुलाजवळ सापळा रचला. संशयास्पदरीत्या आलेल्या अजित कस्तुरे व आदित्य आतार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पिशवीत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी व मोबाईलसह मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना गजाआड केले.


सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अरविंद काळे, स.पो.नि.  मिठू जगदाळे, नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे, अतुल बडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे  पोलीस अधीक्षक सातारा निखिल पिंगळे व  अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !