साताऱ्यात दिव्यांग व्यक्तींची होतेय हेळसांड - दोन महिन्यापासून दिव्यांग व्यक्तींचे अर्ज मंजुरी विना पडून

शासकीय योजना आणि लाभांपासून दिव्यांग व्यक्ती वंचित

शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना दिव्यांगांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत. परंतु या योजना सहजपणे संबंधितांपर्यंत पोहोचत नाहीत त्यासाठी त्यांना अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात ही दुर्दैवी बाब आहे. मुळात दिव्यांगांसाठी असणारे कायदे पाहता त्यांना तात्काळ सहकार्य होणे अपेक्षित आहे. 

Persons with Disabilities Deprived of Government Schemes, shrirang katekar, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दरमहा शासनाकडून पंचवीसशे रुपये भत्ता दिला जातो. शासनाच्या नियमाच्या अधीन राहून विहीत नमुन्यात यासाठी अर्ज भरून द्यावा लागतो. सातारा जिल्ह्यातील असंख्य दिव्यांगांना याचा लाभ होत असतो. दिव्यांगांच्या व्यथा व वेदना दूर व्हावेत यासाठी आर्थिक मदत म्हणून हे अर्थसह्य केले जाते. परंतु शासनाच्या असंख्य योजना दिव्यांगांसाठी उपयुक्त ठरत असताना सरकारी बाबूगिरी अर्थात लाल फिती कारभाराचा फटका या दिव्यांगांना सहन करावा लागत आहे गेल्या दोन महिन्यापासून दिव्यांग व्यक्तींचे अर्ज संजय गांधी निराधार योजनेमध्ये मंजुरी विना पडून आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित आहेत. अर्थसहाय्य प्राप्त व्हावे यासाठी दिव्यांग व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसमध्ये सातत्याने भेटत आहेत परंतु अद्याप अर्ज मंजूर न झाल्यामुळे आपणास भत्ता देता येत नाही अशी कारणे तेथील कर्मचारी देत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा चालू आहे अशा परिस्थितीतही जिल्ह्यातून असंख्य दिव्यांग या कार्यालयाला भेटी देत असतात. येथे आल्यानंतर त्यांचा अर्ज मंजूर न झाल्यामुळे या दिव्यांग्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुळात दिव्यांग व्यक्ती या आर्थिक व मानसिक स्थिती ही कमकुवत झालेली असताना सरकारी बाबू कडून मिळणारी ही दुय्यम वागणूक त्यांच्या मनाला वेदना देतात. दिव्यांगाची होणारी हेळसांड पाहता शासकीय स्तरावर त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. 

 शासनाच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणारी २५०० रुपये हा भत्ता आजच्या महागाईच्या काळात अल्प आहे. दिव्यांगांच्या शारीरिक मानसिक समस्या खूप असतात. औषध उपचार व अन्य खर्चासाठी त्यांना प्रत्येक क्षणी जीवनाशी झगडावे लागत असते. अशावेळी शासकीय स्तरावर अथवा शासकीय कार्यालयात त्यांना सन्मानजनक वागणूक मिळणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना तात्काळ लागू होणे गरजेचे आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारा भत्ता तत्काळ मंजूर करून दिव्यांगांना सहकार्य व्हावे हीच अपेक्षा.  

श्रीरंग काटेकर सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !