सुमारे पाच हजार शाळेत विद्यार्थी पटसंख्या शून्यावर - शिक्षकांचे भवितव्य अंधारमय

भारतातील सरकारी शाळांची दयनीय स्थिती

पश्चिम बंगाल मध्ये जवळपास सात हजार सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. विद्यार्थी पटसंख्येपेक्षा कितीतरी अधिक पटीने शिक्षकांची संख्या असल्याचे दिसून आले आहे.या शिक्षकांचा आर्थिक भार आता पश्चिम बंगाल सरकारला सोसवत नसल्याचे राज्य सरकारचे मत आहे.तर बिहार मधील जवळपास सातशे तीस सरकारी शाळांची हीच स्थिती आहे.तेलंगणा व महाराष्ट्रासह अन्य राज्यात ही विद्यार्थी संख्या कमी व शिक्षकांची संख्या अधिक असेच काहीसे चित्र पाहणीपथकाला आढळून आले आहे. 

Government schools in bad condition, Maharashtra, shrirang katekar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आज झपाट्याने बदलत असून काळाची पाऊले ओळखून प्रगत राष्ट्राने आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये अमुलाग्र बदल घडवीत नवी क्रांती केली आहे.डिजिटल, रोबोटिक व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ते विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करीत असताना भारतातील सरकारी शाळांची स्थिती मात्र मोठी विदारक आहे.भारतातील सरकारी शाळेतील विद्यार्थी पटसंख्येचे घटते प्रमाण हे चिंताजनक असून या शाळेत ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांचेही भवितव्य यामुळे धोक्यात आले आहे.शिक्षण व कौशल्य हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते.संपूर्ण जगाने याचे महत्त्व ओळखलेले आहे.अनेक देशांनी तर शिक्षण व्यवस्थेला प्रथम प्राधान्यक्रम दिला आहे. यासाठी त्यांनी विद्यार्थी घटक हा केंद्रबिंदू ठेवून त्यांना अनेक सोयी सुविधा व उपक्रमशील हेतून प्रेरित करीत आहेत.यासाठी कोट्यावधी रुपयांची आर्थिक तरतूद त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील वार्षिक बजेटमध्ये केली असल्याचे दिसून येत आहे.आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने मनुष्यबळ सक्षम व विकसित करण्याचे धोरण एकीकडे प्रगत राष्ट्र करत असताना मात्र भारतीय सरकारी शाळेचे व्यवस्थापन मात्र पूर्णपणे कोलमडलेले असल्याचे विद्यार्थी पटसंख्येच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.विद्यार्थ्यांनीच शाळेकडे पाठ फिरविल्याने अनेक सरकारी शाळा आता बंद होण्याच्या वाटेवर आहेत.विशेषता बिहार, ओरिसा, तेलंगणा, पश्चिम बंगाल सह महाराष्ट्रातील अनेक सरकारी शाळांची स्थिती खूपच गंभीर असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.यामध्ये देशातील जवळपास दहा लाख तेरा हजार सरकारी शाळांपैकी पाच हजारांहून अधिक शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकत नसल्याचे पाहणीपथकाला आढळून आले आहे.त्यामुळे महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारतापुढे एक मोठे आव्हान आता उभे राहिले आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केंद्र सरकारने अमुलाग्र बदल घडवत भारतीय शिक्षण प्रणाली अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. हे शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धारही केला आहे. त्याला सरकारी शाळेतील पटसंख्येच्या घटत्या विद्यार्थीसंख्येने  मात्र गालबोट लागले आहे.भारतीय सरकारी शाळेतील या परिस्थितीला जबाबदार कोण याचे चिंतन आता करणे क्रमप्राप्त ठरले आहे.खाजगी शिक्षण संस्थांची वाढती संख्या, पालकांची मानसिकता व या संस्थांमधून दिले जाणारे दर्जात्मक व गुणात्मक शिक्षण या स्पर्धेला सरकारी शाळा कुठे कमी पडतात का हेही पाहणे आता तितकेच महत्त्वाचे आहे. 

शैक्षणिक दृष्ट्या अधिक सजग असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागातील सरकारी शाळांची स्थिती दिवसेंदिवस खालवत असून या शाळेतही पटसंख्या अभावी शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहेत. अनेक शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत केले जात असून महाराष्ट्रासारख्या शैक्षणिक दृष्ट्या जागरूक असणाऱ्या राज्याची ही दयनीय स्थिती बाबत आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. विद्यार्थी पटसंख्या चे घटते प्रमाण हे शिक्षकांसाठीही डोकेदुखी ठरत असून विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक दारोदारी फिरुन ही विद्यार्थी सरकारी शाळेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील सुमारे अठरा हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या अल्प असल्याने या शाळांवर बंदीची टांगती तलवार सध्या उभी आहे. 

बिहार, ओरिसा, तेलंगणा व पश्चिम बंगाल हे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले राज्य आहेत.त्यामुळे येथील विकासात्मक प्रगतीला खीळ बसली आहे.शैक्षणिक दृष्ट्या समाज सक्षम झाल्याशिवाय राज्याचा कायापालट शक्य नाही.ही बाब जरी खरी असली तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत असलेली उदासीनतेची भावना राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला घातक ठरत आहे.गरिबी आणि दारिद्र्याच्या खाईत येथील समाज व्यवस्थेमध्ये शिक्षणाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याबाबत खऱ्या अर्थाने प्रबोधन व जनजागृती करून या घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात सामील करण्यासाठी निश्चित धोरण आखले गेले पाहिजे. सरकारी शाळांमध्ये काळाप्रमाणे बदल घडवत आधुनिक शिक्षण प्रणाली दर्जात्मक गुणात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.तरच सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. 

श्रीरंग काटेकर, सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !