सांस्कृतिक कला साधनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पूरक ठरतात - अनिल फुंदे

गौरीशंकर इन्स्टिट्यूट, लिंबचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Annual function of Gauri Shankar institute, art and culture, educational, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

भारतीय संस्कृती आणि कला साधनेचे अतूट ऋणानुबंधाचे नाते राहिले आहे. सांस्कृतिक चळवळ व कला ही तरुणाईची खरी ऊर्जा आहे. या साधनेतून विद्यार्थ्यांना मिळणारी ऊर्जा त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी पूरक ठरते असे मत  जिनोव्ह बायो फार्मास्युटिकलस पुणे चे असिस्टंट जनरल मॅनेजर अनिल फुंदे यांनी व्यक्त केले. ते महासैनिक भवन ता जि सातारा येथे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल  एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचे स्पंदन २०२६ च्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य डॉ. नागेश अलुरकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर डॉ.भूषण पवार, डॉ.धैर्यशील घाडगे, डॉ. माधुरी मोहिते,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.गौरी इथापे,प्रा. रोहन खुटाळे, रजिस्ट्रार निलेश पाटील विद्यार्थी प्रतिनिधी ओम माने, प्रियांका चव्हाण, अक्षय अलदार आदी प्रमुख उपस्थित होते. अनिल फुंदे पुढे म्हणाले की औषध निर्माण क्षेत्रात करिअर घडवण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक ओळख विसरता कामा नये. यावेळी गौरीशंकरचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप म्हणाले की वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना येणारे अनुभव भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरतात. ज्ञानसाधना इतकेच कला साधनेचे महत्त्व असून विद्यार्थिनी आपले सुप्त गुण ओळखून भविष्यातील संधी शोधावी. यावेळी विद्यार्थ्यांनी सोलो डान्स. ग्रुप डान्स. कॉकटेल डान्स. फॅशन शो. विविध विषयावरील नाटिका. सिंगिंग. मुक अभिनय सादर करून रसिका प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौरी इथापे यांनी केले. आभार प्रा. प्राजक्ता कांबळे यांनी केले

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !