वाई-धोम रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात - दोन जण जागीच ठार - १३ वर्षीय मुलगी गंभीर

मेणवली हद्दीत समोरासमोर धडक - पांडेवाडी आणि नेवासा येथील कुटुंबांवर काळाचा घाला
Two killed in road accident, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई-धोम रस्त्यावरील मेणवली गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे चालक जागीच ठार झाले असून, १३ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर एकनाथ पवार (वय ३५, मूळ रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) हे आपल्या पत्नी आणि मुलीसह वाई तालुक्यात ऊसतोडणीसाठी आले होते. साखर कारखाने बंद झाल्याने सध्या ते मेणवली रस्त्यावरील एका विटभट्टीवर कामाला होते. मंगळवारी (दि. २८ एप्रिल) दुपारी घरासाठी लागणारे किराणा व प्रापंचिक साहित्य आणण्यासाठी सागर पवार हे आपली १३ वर्षांची मुलगी पुनम हिला घेऊन दुचाकीवरून वाईला गेले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बाजार आटोपून मेणवलीकडे परतत असताना, समोरून येणारे निलेश मारुती येवले (वय ५०, रा. पांडेवाडी, ता. वाई) यांच्या दुचाकीशी पवार यांच्या दुचाकीची भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, दोन्ही दुचाकींच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत मृत पावलेल्यांची नावे 
१. निलेश मारुती येवले (वय ५०, रा. पांडेवाडी, ता. वाई)
२. सागर एकनाथ पवार (वय ३५, रा. नेवासा, सध्या रा. मेणवली रोड विटभट्टी)
या अपघातात सागर पवार यांची मुलगी पुनम पवार ही गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन बाजाराच्या दिवशी घडलेल्या या भीषण अपघातामुळे मेणवली आणि पांडेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !