गौरीशंकर मध्ये राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न - विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविले
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
भाषेवरील प्रभुत्व व संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात. असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे चे सहसंचालक वित्त व प्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. हर्षदीप जोशी यांनी व्यक्त केले. ते देगाव ता जि सातारा येथील गौरीशंकर चे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयात ए आय हेल्थकेअर या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप डॉ शितलकुमार पाटील प्राचार्य जे जे मगदूम कॉलेज ऑफ फार्मसी जयसिंगपूर डॉ नागेश अलुरकर प्राचार्य सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर उपप्राचार्य डॉ योगेश गुरव सह निमंत्रक डॉ सिमादेवी कदम आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ हर्षदीप जोशी पुढे म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाषा संवादाला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. आपले मत आपले विचार इतरांना सहजतेने पटवून देणे ही भविष्याची गरज भासणार आहे.
गौरीशंकर चे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप म्हणाले की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व अधिक विकसित होण्यासाठी सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करीत असते विद्यार्थ्यांचा या उपक्रमास नेहमीच प्रतिसाद लाभला आहे. या महाविद्यालयाने सलग अठरा वर्ष वकृत्व स्पर्धेचे आयोजन करीत असून ही परंपरा या महाविद्यालयाने अखंडपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू ठेवली आहे.
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला या स्पर्धेमध्ये अपेक्षा चित्रे डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला तर प्रसाद राजगुरू श्रेयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च छत्रपती संभाजीनगर यांनी मिळवला तृतीय क्रमांक प्रणोती धनवडे व आलिना कडवेकर कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड या विद्यार्थिनींना विभागून देण्यात आला. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम अनुक्रमे तीन हजार दोन हजार व एक हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सह निमंत्रक डॉ सिमादेवी कदम तसेच समन्वयक प्रा फिरदोस शेख प्रा दिव्यांनी जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्रांजली फडतरे व ज्ञानेश्वरी कार्वैकर यांनी केले. प्रा दिव्यांनी जाधव यांनी आभार मानले.
ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता हेल्थकेअर या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला पूरक ठरणाऱ्या संभाषण कौशल्य विषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागृती व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते सलग अठरा वर्ष सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी कार्य करीत आहे या अठरा वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याचा त्यांना त्यांच्या जीवनात खूप लाभ झाला आहे.
इंटरनेट व मोबाईल संस्कृतीच्या युगात संवादच हरपला आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु खऱ्या अर्थाने प्रगती व विकास साधायचा असेल तर संवाद ही अत्यंत प्रभावी साधने हे एक कौशल्य तंत्र आहे विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य तंत्र प्राप्त व्हावे यासाठीच खऱ्या अर्थाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता हे सरस ठरत असून याविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भावना संवाद रूपातून व्यक्त व्हावेत यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला होता.
मदनराव जगताप
अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




