यशाचं शिखर सर - डोंगरगावच्या राहुल आग्रेची एमपीएससी परीक्षेत बाजी

कर आणि महसूल सहाय्यक दोन्ही पदांवर निवड

Success in competitive exam, Chhatrapati Sambhaji Nagar, fullumbr, Shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)

कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर एमपीएससी (MPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. राहुल राधाकिसन आग्रे याने एमपीएससी परीक्षेत २८० गुण मिळवून यश संपादन केले असून, त्याची 'कर सहाय्यक' (Tax Assistant) आणि 'महसूल सहाय्यक' (Revenue Assistant) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्षणाचा खडतर प्रवास

आपल्या प्रवासाबाबत 'शिवशाही न्यूज'शी बोलताना राहुलने सांगितले की, त्याचे प्राथमिक शिक्षण डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला दररोज ५ किलोमीटरची पायपीट करावी लागली. फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच त्याचे अधिकारी बनण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने बहरले.

अपयशावर मात करत गाठले ध्येय

राहुलने आपले ध्येय गाठण्यासाठी संभाजीनगर येथील रिअ‍ॅबल स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन घेतले. २०२४ मध्ये त्याने पीएसआय (PSI) पदासाठी परीक्षा दिली होती, परंतु अंतिम निकाल यादीत केवळ दोन गुणांनी त्याला अपयश आले. मात्र, खचून न जाता त्याने अधिक जोमाने अभ्यास केला आणि २०२५ च्या परीक्षेत २८० गुण मिळवून दोन्ही पदांवर आपली मोहोर उमटवली. "माझ्या या यशामध्ये माझे कुटुंब आणि सर्व गुरुजनांचा मोठा वाटा आहे," अशी भावना राहुलने यावेळी व्यक्त केली.

माजी शाळेत जंगी सत्कार

राहुलने मिळवलेल्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, चिंचोली येथे त्याचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. कृष्णा फलके यांच्या हस्ते राहुलचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. "आमच्या शाळेचा विद्यार्थी आज उच्च पदावर पोहोचला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राहुलचा आदर्श घ्यावा," असे गौरवोद्गार मुख्याध्यापक फलके यांनी काढले.

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा फलके यांच्यासह बनसोडे तातेराव, संतोष बडक, अशोक पवार, नितीन जंगले, बी. जाधव, योगेश मोरे, पुंडलिक मालकर, किशोर घुसिंगे, अनिल देहाडे आणि अण्णासाहेब जाधव आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र जंगले यांनीही राहुलचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !