पश्चिम भागातील जललक्ष्मी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार - स्वप्निल गायकवाड

तालुक्यातील जवळपास ३०% भाग सिंचनाखाली येणार

Siphon Irrigation Method, jal lakshmi irrigation scheme, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

पश्चिम भागाची जीवनवाहिनी म्हणून ज्या योजनेकडे पाहिले गेले ती म्हणजे "जल लक्ष्मी सिंचन योजना"  पश्चिम भागातील बलकवडी या धरणातून साईपण पद्धतीने पाईपलाईनच्या माध्यमातून पसरणी पर्यंत व दुसऱ्या बाजूने आकोशीपर्यंत ही योजना कार्यान्वित आहे. पश्चिम भागाच्या धरणाच्या एका बाजूला पसरणी पर्यंत सिंचन प्रक्रियेला हातभार लावणारी योजना तोडक्या मोडक्या स्थितीत का होईना सुरू आहे. दुसऱ्या बाजूला बलकवडी पासून अकोशी पर्यंत ही योजना सुरू आहे मात्र अकोशी पासून पुढे अभेपुरी व त्यापासून वाई तालुक्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे वेळे या गावापर्यंत जर योग्य पद्धतीचे नियोजन करून ही योजना उभारण्यात आली तर वाई तालुक्यातील जवळपास ३०% भाग हा सिंचनाखाली येऊ शकतो यात कोणतीही शंका नाही. 

सायपण पद्धतीने सुरू असणारी ही योजना वाई तालुक्यासाठी एका प्रकारची जीवन वाहिनी होऊ शकते याचा विचार येणाऱ्या काळामध्ये होणे गरजेचे आहे. अकोशी पासून जांभळी पर्यंत व जांभळी पासून अभेपुरी मार्गे पुढे पूर्व भागापर्यंत ही योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला जी गावे आपण बघतो या गावांमध्ये सिंचनाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी शेती ही हंगामी स्वरूपात आजही करण्यात येते. उन्हाळ्यामध्ये धरणाच्या कुशीत असून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा या भागातील गावांना मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे ही योजना वाईच्या पश्चिम भागाला या भागातील शेतीला या भागातील पाणीपुरवठा योजनांना फार मोठे बळ देऊन जाणार आहे यात शंका नाही. 

योजना उभारण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये योग्य उपाय योजना राबवण्याचे काम करणार असल्याची माहिती यशवंत नगर गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य  स्वप्निल गायकवाड यांनी दिली. प्रशासनासोबत समन्वय साधत ही योजना अकोशी पासून पुढे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार व आकोशी पासून जांभळी व जांभळी पासून अभेपुरी पर्यंत याची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणार.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !