वाई मध्ये गटाराऐवजी रस्त्यावरून सांडपाण्याचा प्रवाह

नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

Sewage flows through the streets instead of through sewers, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आणखी एक ठळक उदाहरण समोर आले आहे. शहरातील गुलाबराव खामकर पथ या महत्त्वाच्या रस्त्यावर थोडासा पाऊस जरी झाला तरी गटारातील पाणी रस्त्यावरून वाहू लागते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे वाई नगरपरिषद पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर रस्ता हा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा असून ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक, माता-भगिनी यांचा सतत या मार्गावरून प्रवास असतो. मात्र, गटाराची अयोग्य रचना आणि कामातील निष्काळजीपणामुळे नागरिकांना अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे. माहितीनुसार, नुकतेच या भागात नवीन गटार बांधण्यात आले. परंतु या गटाराला आवश्यक असलेले होल (पाणी वाहून जाण्याचे मार्ग) तयार करण्यासच नगरपालिका विसरली आहे. परिणामी, पावसाचे पाणी गटारात न जाता थेट रस्त्यावरून वाहते आणि या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप प्राप्त होते.

या प्रभागात काही दिवसांपूर्वीच अटीतटीची निवडणूक पार पडली होती. निवडणुकीदरम्यान जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. “निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिक दबक्या आवाजात व्यक्त करत आहेत.गटाराचे काम करताना त्यातून पाणी योग्यरित्या वाहते की नाही याची कसलीही खात्री न करता केवळ काम पूर्ण दाखवून बिल काढले जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

 परिणामी, थोडासा पाऊस झाला तरी संपूर्ण परिसरात पाणी साचते आणि नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.यासंदर्भात विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न सभागृहात जोरदारपणे उपस्थित करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, या रस्त्यावरून वाहणारे पाणी तात्काळ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.वाई नगरपरिषदेने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !