वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी मृत प्रत्येक शेळीला मदत देणार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सोमवार दि. 30 मार्च रोजी वाई तालुक्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाटासह गारांचा मुसळधार,अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी ४ ते ४:१५ वाजण्याच्या स़ुमारास आसले ता.वाई गावच्या हद्दीत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याच्या टाकी जवळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ वय ५० राहणार पांडवनगर आसले हे मेंढ्या चारत असताना विज कोसळल्याने १५ बकरी जाग्यावर ठार झाल्याने ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे .
या गंभीर घटनेची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्याचे सहकारी शिवाजी तोरडमल, चंद्रकांत भोसले, चालक कांबळे होमगार्ड सुशांत धुरगुडे असा पोलिस दलाचा ताफा पडत असलेल्या मुसळधार पाऊसात आसले गावात पोचला तेथील घटना स्थळाची पाहणी करून मृत १५ मेंढ्यांचा पंचनामा करण्या साठी भुईंजचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सिसोदे गाव कामगार तलाठी अभंग यांना बोलावुन घेऊन
पंचनामा पुर्ण करुन त्याचा अहवाल वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी व वाई विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या कडे पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात आला आहे . या गंभीर घटनेची माहिती आसले गावासह संपुर्ण वाई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
या गंभीर घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी तोरडमल हे करीत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



