‘वसंत बहार’ – सुरांच्या मैफिलीने रिजवली रसिकांची मने
शिवशाही वृत्तसेवा,अकोट प्रतिनिधी
स्थानिक शेतकरी मोटर्स, दर्यापूर रोड, अकोट येथे सांस्कृतिक व संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अकोट मेलोडी ग्रुप,वतीने ‘वसंत बहार’ या सुरांच्या मैफिलीने रसिकांची मने जिंकली.या मैफिलीत अनेक सदाबहार हिंदी व मराठी गीते सादर करण्यात आली.मार गई मुझे 'तेरी जुदाई,‘हुस्न पहाडों का’,‘एक तेरे ही चेहरे पर’, ‘प्रियतमा प्रियतमा’,‘घुंगट की आड से’,‘हृदयी वसंत फुलताना’ यांसारख्या अनेक गाण्यांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची विशेषता म्हणजे प्रसिद्ध गायिका हेमा जोशी (अकोला) यांनी मेलोडी ग्रुपच्या सदस्यांसोबत युगल गीते सादर करीत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे बहारदार व रंगतदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट प्रविण पुंडगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेलोडी ग्रुपचे अध्यक्ष योगेश वर्मा,सचिव भास्करराव वानखडे, नंदुभाऊ शेगोकार, हिम्मत दंदी, कोषाध्यक्ष अरुण सांगळूदकर तसेच व्यवस्थापक कैलास बोरकुटे, शेतकरी मोटर्स चे अजिंक्य नाथे, अनिल खलोकार, दर्शन ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी नंदुभाऊ शेगोकार, संदिप ढोक,मिलिंद तेलगोटे, पवन पातूरकर,ओमप्रकाश डेबला ,अनंत काळे,विजय भोरे,सुनिल धुळे,आदित्य गुप्ता, किरण गुहे,योगेश वर्मा,दीपक तळोकार,स्वप्नील आढे,भास्कर वानखडे,मोहन सपकाळ, कन्हैया गौर,डॉ.विशाल इंगोले,आशिष बारबदे,गजानन तायडे,श्याम राऊत,हिम्मत दंदी, कैलास बोरकुटे,आनंद भोरे, अरुण सांगळूदकर,प्रताप सोळंके,दिगंबर वणारे या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात गीते सादर केली.
कार्यक्रमास अकोट शहरातील गणमान्य लोकांसोबत मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. वसंत बहार ला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित रसिक श्रोत्यांनी मेलोडी ग्रुप ची भरभरून स्तुती करत कार्यक्रमाचा आनंद घेतला
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




