सघन लागवड पद्धत, दादालाड तंत्रज्ञान, वाणांची निवड, जैविक किटकनाशकांचा वापर आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र गांधेली येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कापूस उत्पादन वाढीसाठी विशेष कापूस प्रकल्पांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी अंतरावरील कपाशी लागवड, सघन लागवड पद्धत, दादालाड तंत्रज्ञान, वाणांची निवड, जैविक किटकनाशकांचा वापर आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरीष्ठ शास्त्रज्ञ काकासाहेब सुकासे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून रामेती चे निवृत्त उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम जोशी होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री. काकासाहेब सुकासे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान, मृदा शास्त्र विभाग प्रमुख श्री. स्वप्निल वाघ यांनी माती परीक्षणाचे उत्पादनातील महत्त्व आणि खत व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. जोशी यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे विष्णु गायकवाड, भरत शिंदे, सुरज गोरे व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




