वाई शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत ॲक्शन मोडमध्ये

मंत्रालयात धडक, सर्वांगीण आराखड्याला गती

Anil Sawant has taken concrete steps for the development of the city, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे

वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आता जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निवडून आल्यानंतर पत्रकार परिषदेत जाहीर केलेला ९० दिवसांत विकास आराखडा प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला असून सध्या ते मंत्रालयाच्या वाऱ्या करत विविध प्रलंबित कामांना गती देत आहेत.

आज राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत वाई शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची  गेल्या आठवड्यात त्यांनी मंत्रालय येथे भेट घेतली होती त्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं आहे व ते सध्या पूर्ततेकडे चालू असल्याचंही बोललं जात आहे .

शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व नागरी सोयीसुविधा यांचा समावेश असलेला व्यापक विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच कागदावर उतरवला जाईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना अनिल सावंत म्हणाले, “वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मंत्रालय स्तरावर आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू असून लवकरच ठोस निर्णय समोर येतील.”

वाई शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या या हालचालींमुळे नागरिकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काळात शहराच्या विकासाला नवे वळण मिळणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !