तहसील कार्यालयात बेकायदेशीरपणे पुरवठा विभागात काम करणाऱ्या यश सोनकांबळे यांना केले हद्दपार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मौजे नायगाव तहसील कार्यालयात मागील आठ वर्षापासून पुरवठा विभागामध्ये यश सोनकांबळे नावाचा व्यक्ती पुरवठा विभागामध्ये नवीन राशन कार्ड काढणे राशन कार्ड दुरुस्ती करणे अशी कामे करत होता मुळात त्याला कुठलीच प्रशासनाची परवानगी नव्हती तरीही आजपर्यंत पुरवठा विभागातील दराडे मॅडम यांच्या छत्रछायेखाली तो काम करत होता.
मुळात त्याला आठ वर्षे अगोदर तीन महिन्यासाठी ई मशीन ऑपरेटर म्हणून नियुक्त केले होते त्यानंतर त्याने आजपर्यंत कुठलेही नियुक्तीपत्र रिन्यू केले नाही आणि आजपर्यंत तहसील मधील तहसीलदार असतील पुरवठा विभागातील अधिकारी असतील यांच्या संगणमताने काम करत आहे प्रत्येक आरसी दुरुस्त करण्यासाठी लाच मागत असल्याचे जनतेतून निदर्शनास आले होते.
या अनुषंगाने नायगाव येथील शिवसेनेचे गजानन पाटील तमलुरे यांनी नायगाव तहसील कार्यालयात पर्यायी व्यवस्थित आलेले IAS अनन्या रेड्डी यांची भेट घेत त्यांना हे सर्व निदर्शनास आणून देताच त्यांनी तात्काळ त्यांना तहसील कार्यालयातून काढून टाकण्याचे आदेश दिले त्यानंतर जर तो व्यक्ती तहसील कार्यालयात काम करताना दिसला तर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला...
पण हे सगळं होत असताना तत्कालीन तहसीलदार या आधीचे तहसीलदार यांनी या विषयावर कारवाई का केली नाही का यांचे सर्वांचे संगणमत होते.
यावर जिल्हाधिकारी हे काय निर्णय घेतील त्यांच्यावर कारवाई होणार का?
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




