५ मार्च रोजी रंगणार ऐतिहासिक बगाड सोहळा - १५० वर्षांची परंपरा जोपासत फुलेनगर सज्ज

फुलेनगरच्या बगाडाचा मान कैलास जमदाडे यांना; ३५ वर्षांच्या निस्वार्थ सेवेचे फळ!

Historic Bagad ceremony, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

वाई येथील फुलेनगरच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध बगाड यात्रेचा २०२६ सालचा मान माजी नगरसेवक कैलास जमदाडे यांना मिळाला आहे. कोणतीही मागणी न ठेवता, केवळ श्रद्धेपोटी लावलेल्या कौलाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जमदाडे परिवारासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. येत्या गुरुवार, ५ मार्च रोजी हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे.

कैलास जमदाडे यांनी १९९० सालापासून, म्हणजेच गेली ३५ वर्षे बगाडाची सेवा निष्ठेने केली आहे. बगाड कमिटीचे खजिनदार म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली असून, वाई नगरपरिषदेचे माजी नगरसेवक म्हणूनही त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, कोणताही नवस केलेला नसताना केवळ सेवेचे फळ म्हणून यंदा बगाडाचा हा सर्वोच्च बहुमान त्यांच्या पदरात पडला आहे.

  फुलेनगरच्या बगाडाला १५० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेत अनेक चढ-उतार आले. १९५२ साली एका अपघातामुळे बगाड बंद करण्यात आले होते. त्या काळात केवळ मानाची काठी आणि पालखी सोहळा सुरू होता. त्यानंतर १९६२ साली ग्रामस्थांच्या श्रद्धेपोटी १० वर्षांनंतर पुन्हा बगाड सुरू करण्यात आले. त्यावेळी पुन्हा बगाड सुरू झाल्यावर पहिला मान हरी काळू जमदाडे यांना मिळाला होता. त्यानंतर आता त्याच घराण्यातील कैलास जमदाडे यांना हा मान मिळाल्याने परंपरेचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

     गुरुवारी सकाळी वाकेश्वर येथे बगाडाची विधिवत पूजा करून उत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर वाजत-गाजत आणि गुलालाच्या उधळणीत गाव प्रदक्षिणा घातली जाईल. बलदंड बैलांच्या जोड्यांच्या सहाय्याने हा बगाडाचा गाडा ओढला जाणार असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, "मी गेल्या ३५ वर्षांपासून बगाडाची सेवा करत आहे. कधीही मनामध्ये मानाची इच्छा धरली नव्हती, परंतु देवाने माझ्या सेवेची दखल घेऊन हा बहुमान दिला, याचा मला सार्थ अभिमान आहे." अशी भावना कैलास जमदाडे, मानकरी (माजी नगरसेवक) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !