बावधन बगाड यात्रेच्या नियोजन बैठकीत ग्रामस्थाना आवाहन.
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
आपल्या बावधन गावची बगाड यात्रा ही जगप्रसिद्ध आहे.या यात्रेच्या नियोजनाची सेवा मला मिळाली हे माझं भाग्य समजतो.आपण सर्वजण मिळून ही यात्रा निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पाडू.असा संदेश वाई तालुका उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे यांनी बावधन येथील ग्रामस्थांना दिला.येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ बगाड यात्रा रविवारी (ता.८) रोजी होणार आहे यावेळी शनिवारी (ता ७) रोजी नाथांचा शाही छबिना तर,सोमवारी ( ता.९) रोजी भव्य कुस्ती मैदान होणार आहे.यासंदर्भात घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी नारायण घोलक, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे,वैद्यकीय अधीक्षक सचिन वाळुंजकर,उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग महेश गोंजारी,राज्य परिवहन महामंडळ व्यवस्थापक युवराज कदम,उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील मेटकरी,उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग महेश टाकसाळे,महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग अधिकारी गणेश कोदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन पाटील, सह आयुक्त तालुका कृषी पशुसंवर्धन अधिकारी सुनील देशपांडे, मंडळ अधिकारी धनंजय भोसले, ग्राम महसूल अधिकारी संकेत साळुंखे,ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत धुमाळ ,किसनवीर कारखान्याचे संचालक शशीकांत पिसाळ,दिलीप पिसाळ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मदन भोसले,पंचायत समिती सदस्य सचिन भोसले,तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी कचरे,विवेक भोसले,भैरवदेव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अजित पिसाळ,सरपंच वंदना कांबळे,तसेच सर्व सदस्य,आजी माजी सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थानी यात्रेमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच त्यासाठी लागणारी प्रशासनाची साथ यावर चर्चा करण्यात आली.आरोग्य विभागाकडून ग्रामस्थाना पिण्याचे शुद्ध पाणी,यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने औषधोपचार करण्यात यावेत,तसेच यात्रा कालावधीत बगाड मार्गात असणारे विद्युत वाहक त्या काळासाठी बंद करून बगाड मंदिरामध्ये आल्यानंतर तातडीने लाईट पुरवठा चालू करण्यात याव्या अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात्रा कालावधीत बाहेरून येणाऱ्या खाद्य दुकानदारांना गॅस नियंत्रण करणे युनिट देण्यात यावे,तसेच स्वच्छता आणि पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशा आदेश देण्यात आला.
यात्रेमध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोणतीही चार चाकी वाहन या कालावधीत गावामध्ये सोडलं जाणार नाही.तसेच यावेळी चोरी,भांडण,कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क राहून काळजीपूर्वक काम करणार असल्याचं पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.तसेच वाई बावधन रस्त्यावर असलेलं अतिक्रम लवकरात लवकर हटविण्यात यावे अशा आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले.
अशा पद्धतीने संपूर्ण यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्याची जबाबदारी ही प्रशासन तसेच सर्व ग्रामस्थांची आहे.आलेल्या पाहुण्यांना योग्य प्रकारे सहकार्य करून यात्रा पार पाडू असा संदेश प्रशासन ग्रामस्थांना दिला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




