स्वेरीच्या विद्यार्थ्यांची मारापूरमध्ये ’ऊर्जा व्यवस्थापन आणि संवर्धन जनजागृती’ या विषयावर रॅली संपन्न

उपक्रमाला मारापूरच्या ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद

Energy Management and Conservation Awareness Rally, Solapur, pandharpur Shivashahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर- मारापूर (ता. पंढरपूर) मध्ये गोपाळपूर  येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेसा अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने ’ऊर्जा व्यवस्थापन आणि संवर्धन जनजागृती’ या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या उपक्रमाला मारापूरच्या ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. 

       स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली मारापूर मध्ये या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. मारापूरचे सरपंच व नूतन पंचायत समिती सदस्य विनायकराव यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब यादव, उपसरपंच अशोक आसबे, दामाजी शुगरचे माजी संचालक भुजंगराव यादव, डॉ. सत्यवान यादव, तुकाराम यादव, राजकुमार यादव, विठ्ठल आसबे, गजानन माने, नागनाथ आसबे यांच्यासह मारापूरचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या रॅलीचे नियोजन प्रा. पोपट आसबे यांनी केले होते. 

या रॅलीच्या माध्यमातून ‘ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनाचे महत्त्व’ हे ग्रामस्थांना माहित व्हावे या उद्धेशाने ग्रामस्थांनी भविष्याचा विचार करून उर्जेची बचत करावी हा होता. यावेळी भव्य पोस्टर प्रदर्शन व घोषणाही देण्यात आल्या. या रॅलीद्वारे ग्रामस्थांमध्ये ’ऊर्जा व्यवस्थापन आणि संवर्धन जनजागृती’ करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे विचार ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या  रॅलीत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या मेसा मधील जवळपास १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे या उपक्रमामुळे मारापूर व पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !