वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती

 नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांचा गंभीर आरोप

Municipality School development, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठीत करताना गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप संबंधित प्रभागाचे नगरसेवक  गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. नियमबाह्य पद्धतीने समितीची स्थापना करून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.

नगरसेवक चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सिद्धनाथवाडी प्रभागातील शाळा क्र. १० ही त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे, पालकांची सभा न घेता आणि कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता समिती गठीत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विद्यार्थ्यांच्या पालकाचीच नियुक्ती होणे आवश्यक असताना, या नियमाची सरळसरळ पायमल्ली झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, समितीची रचना ही राजकीय दबावाशिवाय व लोकशाही पद्धतीने व्हावी हा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र एकतर्फी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित नियमबाह्य समिती तात्काळ बरखास्त करावी, तसेच मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करून नव्याने पारदर्शक पद्धतीने समिती गठीत करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याकडे कशी दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या पत्राच्या प्रति मुख्याधिकारी आणि शिक्षण सभापतींनाही पाठवण्यात आले असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 

शाळेचा कारभार पारदर्शक हवा आणि त्यात पालकांचा सहभाग नियमानुसारच हवा जर नियम धाब्यावर बसवले जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही.  काही शिक्षक नगराध्यक्षांना विश्वासात घेत नाहीत असे चित्र सध्या वाई नगरपरिषद पाहायला मिळत आहे. 

गुरुप्रसाद राजू चव्हाण 

नगरसेवक वाई नगरपरिषद

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !