जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक

सर्वाधिक विक्री आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे या समूहाने सर्वांचे लक्ष घेतले वेधून

Mini Saras' exhibition, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय 'मिनी सरस' प्रदर्शनात कराड तालुक्यातील सिताई स्वयंसहायता समूह (तळमावले) यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावून यशाचे शिखर गाठले आहे. सर्वाधिक विक्री आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे या समूहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 प्रदर्शनाच्या सुरुवातीला जेवणाच्या स्टॉलला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, हार न मानता समूहाच्या अध्यक्षा कविता कचरे आणि तेजस्वी मोहिते यांनी कल्पकता लढवली. त्यांनी तात्काळ कलिंगड कापून २० रुपयांना प्लेट विक्री सुरू केली, तसेच चहाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांच्या या 'इन्स्टंट' आयडियाला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला, ज्यामुळे समूहाने विक्रीचा उच्चांक गाठला.

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंचावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या समूहाचा गौरव करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, पंचायत समिती सदस्या स्वाती थोरात, प्रताप चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कविता कचरे व सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

"उमेद अभियानामुळे आम्हा ग्रामीण महिलांना संकटांवर मात करण्याचे बळ मिळाले आहे. फलटणच्या सुषमा माने यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कराडच्या ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो." असे यावेळी कविता कचरे (अध्यक्षा, सिताई स्वयंसहायता समूह) म्हणाल्या.

     या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले यांच्या धोरणात्मक पाठबळासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ याशनी नागराजन आणि 'उमेद' टीमच्या निलेश पवार, श्रीकांत कुंभारदरे, चिन्मय, धनंजय पाटील व इतर अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे समूहाने नमूद केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !