हर्षवर्धन मोरे यांची वाईच्या गटशिक्षणाधिकारी पदी कायम पदस्थापना

तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाची लाट

Joy in academic circles, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुका शिक्षण विभागाचा डोलारा सांभाळणारे कार्यक्षम अधिकारी हर्षवर्धन मोरे यांची वाई तालुका गटशिक्षणाधिकारी पदी कायमस्वरूपी पदस्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून ते परिविक्षाधीन कालावधीत येथे कार्यरत होते. त्यांच्या या कायम नियुक्तीमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाची लाट पसरली आहे.

शिक्षक संघाची मागणी आणि मंत्र्यांचा पाठपुरावा

मोरे यांची कार्यपद्धती आणि शिक्षकांशी असलेले सुसंवाद लक्षात घेता, त्यांची वाई तालुक्यातच कायम पदस्थापना व्हावी, अशी आग्रही मागणी वाई तालुका शिक्षक संघाने केली होती. शिक्षक संघाच्या या मागणीची दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांना विशेष शिफारस पत्र दिले होते. या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने मोरे यांच्या कायम नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. 

या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी वाई तालुका शिक्षक संघाच्या वतीने श्री. हर्षवर्धन मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार प्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस दत्तात्रय गोळे, ज्येष्ठ नेते महेंद्र इथापे, भास्कर पोद्दार, सहदेव फणसे, सुशांत मोतलिंग, कार्याध्यक्ष विशाल जरंडे, राहुल हावरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल माने, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, फुलचंद महांगडे, किरण पवार, ज्ञानेश्वर धायगुडे, नवनाथ भांगरे आदी उपस्थित होते. 

यावेळी विजय जाधव (अध्यक्ष, वाई तालुका शिक्षक संघ) म्हणाले, " मोरे साहेबांच्या कायम नियुक्तीमुळे वाई तालुक्यातील प्रलंबित शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील आणि प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. त्यांच्या नियुक्तीसाठी शिक्षक संघाने केलेल्या मागणीला न्याय मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे." हर्षवर्धन मोरे यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि संयमी अधिकारी तालुक्याला कायमस्वरूपी मिळाल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !