व्याजवाडीत भक्तीचा जागर - श्री संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व सभा मंडपाचे थाटात उद्घाटन

मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला सोहळा; भाविकांची मोठी उपस्थिती

Jagar of devotion, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

तालुक्यातील व्याजवाडी येथे शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण तसेच नूतन सभा मंडपाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या सोहळ्याने संपूर्ण व्याजवाडी परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

     पुसेगावचे श्री प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधीवत मूर्तींची प्रतिष्ठापना व मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. तर ग्रामस्थांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

     यावेळी बोलताना ना. मकरंद पाटील यांनी व्याजवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. "धार्मिक कार्यामुळे समाजात सलोखा निर्माण होतो आणि गावाच्या विकासाला अध्यात्माची जोड मिळते," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

     या सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने दिलीप पिसाळ, विक्रम पिसाळ, शशिकांत पवार, शिवाजीराव पिसाळ, लक्ष्मणराव पिसाळ, संतोष पिसाळ, विठ्ठल पिसाळ, शहाजी पिसाळ, उत्तमराव भोसले, सतीश पिसाळ, डॉ. अमर जमदाडे, बापूसाहेब जमदाडे, महेंद्र जमदाडे, यशवंत जमदाडे, प्रदीप जमदाडे, बापुसो राजपुरे, नामदेव मालुसरे, संपत मालुसरे, ज्ञानेश्वर मालुसरे, रामदास पिसाळ, बाबासो पिसाळ, अरुण शेडगे, मारुती चव्हाण, संतोष (दादा) पिसाळ, दिलीप पिसाळ, गणेश पिसाळ, संजय भ. पिसाळ आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याजवाडीतील सर्व तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !