भुईंज पोलीस अन् ग्रामसुरक्षा दलाचा रुद्रावतार शेतीपंपाच्या मोटारी चोरणारी टोळी जेरबंद

२ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; उडतारे परिसरातील चोरीचा छडा

Gang of agricultural pump motor thieves arrested, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

गेल्या काही दिवसांपासून वाई तालुक्यातील शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या इलेक्ट्रिक मोटार चोरांच्या मुसक्या आवळण्यात भुईंज पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. उडतारे परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारींचा छडा लावत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ६ मोटारी, तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

उडतारे येथील शेतकरी विशाल वसंत जगताप यांच्या शेतातील 'ल्यूबी' कंपनीची ३ एचपीची मोटार १० ते ११ मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासाचे कडक आदेश दिले होते.

ग्रामसुरक्षा दलाचे प्रसंगावधान

तपासाचा भाग म्हणून भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी परिसरातील पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलाची बैठक घेऊन रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. जांब गावच्या ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित इसम आढळले. दलाच्या सदस्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना पकडले आणि तातडीने पोलिसांना पाचारण केले.

पोलिसी खाक्या अन् कबुली

संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोटार उघडण्याचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी उडतारे आणि खडकी भागातील चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपक संतोष मोरे (वय २६) आणि रुपेश संतोष मोरे (वय २०, दोघे रा. कळंबे, ता. वाई) अशी आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल:

०६ इलेक्ट्रिक मोटारी (किंमत १ लाख ५० हजार रुपये))

तांब्याच्या तारा 

मोटार उघडण्याचे साहित्य

गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल

एकूण किंमत: २ लाख ९० हजार रुपये

तपास पथक:

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, पो.उ.नि. पतंग पाटील, सुरज शिंदे, स.पो.फौ. शिंदे, कांबळे, तोडरमल आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या धाडसी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी संपूर्ण पथकाचे आणि ग्रामसुरक्षा दलाचे अभिनंदन केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !