शिवनगर कन्नडमध्ये जागतिक महिला दिन सप्ताहाची सांगता; पोलीस निरीक्षक सानप यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा,कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड (प्रतिनिधी): "आजची महिला सक्षम, स्वावलंबी आणि कर्तृत्ववान आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी महिलांनी निर्भयपणे मदतीसाठी पुढे यावे," असे आवाहन कन्नड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांनी केले.
श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर येथे अभय केंद्र (खुलताबाद) व सखी वन स्टॉप सेंटर (कन्नड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जागतिक महिला दिन जनजागृती सप्ताहाच्या' सांगता समारंभात ते बोलत होते.
विविध उपक्रमांनी जनजागृती
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष श्री. साबुसिंग राठोड यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री. सानप, संरक्षण अधिकारी श्री. हर्षल पाटील, सखी वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक पल्लवी पाटील, जयश्री गिरासे, गणेश घुगे व भीमदेव चव्हाण यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांना कायदे व सुरक्षा मार्गदर्शन
उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क आणि समाजातील त्यांच्या स्थानावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. सानप यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षेसाठी उपलब्ध असलेले विविध कायदे, हेल्पलाईन सेवा आणि सरकारी यंत्रणांची माहिती दिली. तरुण पिढीने महिलांविषयी आदरभाव ठेवून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असेही त्यांनी नमूद केले.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 'बेटी बचाव बेटी पढाव', 'नारीशक्ती' आणि 'महिला सक्षमीकरण' या विषयांवर प्रभावी चित्रे साकारली होती. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नियोजन व परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास सुरडकर, सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्षा सरला सोनवणे, संचालक शिवाजी वाघ, मुकुंद शिंदे, मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला सन्मान व सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




