वाई मतदारसंघाच्या विकासाला बुस्टर डोस रस्ते आणि पुलांसाठी २९.७७ कोटी मंजूर

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागातील दळणवळण होणार सुसाट

Booster dose for the development of Wai constituency, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २९ कोटी ७७ लाख रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.

     वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. ग्रामीण जनतेच्या मागण्या तसेच पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

     महाबळेश्वर येथील प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेमुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा थेट लाभ स्थानिक व्यावसायिकांना मिळणार आहे. या कामांमुळे मतदारसंघातील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !