काम करत आलोय,- काम करतच राहणार - बावधन गटासाठी ऋतुजा शिंदेंचा निर्धार

कडेगाव येथे प्रचार दौऱ्या वेळी  उस्फूर्त प्रतिसाद

election campaign, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

बावधन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा शिंदे यांनी कडेगांव, व्याहळी, शंकरनगर  प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासकामांचा ठोस आराखडा मांडत, आपण आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून पुढील काळातही त्याच बांधिलकीने काम करत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

ऋतुजा शिंदे म्हणाल्या की, विराज शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बावधन गटातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. “माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा विकास असून, आश्वासनांपेक्षा कामावर माझा विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मी पंचायत समिती सदस्य असताना प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर बावधन गटासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. . कोणतीही समस्या असेल तर थेट माझ्याकडे या. माझ्या स्तरावर प्रश्न सुटला नाही, तर मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून तो मार्गी लावला जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

बावधन गटातील विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी  रस्त्यांची कामे, शेतजमीन ओलिताखाली आणणे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे नमूद केले. ऋतुजा शिंदे यांनी  कडेगाव, व्याहळी,  शंकरनगर  येथे बावधन गटातील मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून विकासाच्या दिशेने साथ देण्याचे आवाहन केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !