वाई राजकारणात सुशिक्षित नेतृत्वाचा उदय
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
राजकीय वारसा लाभला असला तरी, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि समाजसेवेच्या जोरावर एका सुशिक्षित महिलेने सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आहे. एमडीएस डेंटिस्ट असओो निधन ववौमषलेल्या या रणरागिणीने २०१९ पासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा श्री गणेशा केला आहे.
डॉ. सुरभी भोसले या पंचायत समिती भुईंज गणातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
राजकारणात टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? या प्रश्नावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 'संयम' असे उत्तर दिले. "माझे वडील मदन दादा यांच्याकडून मी संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकले. राजकारणात चढ-उतार येत असतात, पण संयम राखला तरच आपण लोकांची सेवा करू शकतो," असे त्यांनी यावेळी नमूद केले.
एक डॉक्टर असल्याने आरोग्य सेवेतील त्रुटींची जाणीव असल्याची ते म्हणाल्या. दुर्गम भागातील लोकांसाठी 'मोबाईल व्हॅन्स'च्या माध्यमातून घरोघरी आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच, ग्रामीण भागातील शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेट आणि डिजिटल बोर्डांची उपलब्धता करून देण्याचे स्वप्न त्यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'लाडकी बहीण' योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत, आगामी काळात युवकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात वारसा मिळाला असला तरी, आपल्या कामातून आणि आधुनिक विचारांतून त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुशिक्षित आणि संवेदनशील नेतृत्वामुळे मतदारसंघाचा कायापालट होईल, असा विश्वास येथील मतदारांमधून व्यक्त केला जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



