बापूसाहेबांच्या साथीला सुपुत्र मैदानात - विकास शिंदेंनी मांडला पश्चिम भागाच्या विकासाचा रोडमॅप

निवडणुकीच्या प्रचाराला वेग

Election, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

गेली ५० ते ६० वर्षे पश्चिम भागातील जनतेची निस्वार्थ सेवा करून ‘लोकनेते’ ही पदवी मिळवलेले लोकनेते बापूसाहेब शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवीत असून त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण यशवंतनगर गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र विकास शिंदे हे यशवंतनगर येथे मतदारांना सामोरे जात होते. 

त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, भविष्यातही पश्चिम भागाचा अधिक वेगाने विकास करायचा आहे या जिद्दीने तब्बल ७८ ते ८० वयातही तरुणांना लाजवेल अशा उमदीने आणि धडाडीने ते काम करत आहेत. एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेले बापूसाहेब शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी विकास शिंदे यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !