अत्याचारी नराधमाचा 'गेम ओव्हर

 'पाचगणीतील 'त्या' नराधमाला २० वर्षे कोठडी!

The cruel mans game is over, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा(प्रतिनिधी शुभम कोदे)  

सप्टेंबर २०२३ मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आरोपी वसीम रजा याने एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिचे व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडितेने हिंमत दाखवून तक्रार दिल्यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. भागवत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वरिष्ठ वकील दयाराम एस. पाटील आणि सहा. सरकारी वरिष्ठ वकील महेश यु. शिंदे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. एकूण १० साक्षीदारांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत विविध कलमांनुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

 या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आणि आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चोख काम केले.

 न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी भुजंगराव काळे, कीर्तीकुमार कदम, सुधाकर संपकाळ, अविनाश ढेरे, हेमा कदम, शिवाजी पांब्रे आणि प्रीतम नाळे यांनी मोलाची भूमिका बजावली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !