वंजारी समाज बांधवांचे ठाणेदारांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून गावकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वंजारी समाज बांधवांच्या वतीने बिबी पोलीस ठाणेदार यांच्याकडे केली आहे
यासंदर्भात भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, डॉ. गजानन घुले, सुनील केंद्रे, प्रभाकरराव ताठे, भगवानराव सानप, ॲड. शिवाजी सानप, हिंमतराव सानप, पाटील
बुवा आंधळे, संतोष रणमाळे, तुळशीराम करपे, नागेश घुगे, नामदेव मुळे, तानाजी खुळे यांच्यासह शेकडो वंजारी समाज बांधवांनी ठाणेदार यांना निवेदन दिले. निवेदना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या
जागेवरून सुरु झालेल्या वादामध्ये गावातील संरपच व इतर महिला याचेवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. वास्तविक वस्तुस्थितीची चौकशी न करता सदर घटनेचे गांभीर्य न ओळखत जवळपास गावातील १०० ते
११० जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे चिखला काकड गावकऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करावी, गावामध्ये बाहेर गावातील व्यक्तींना येण्यास प्रतिबंध घालण्यात यावा, पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे तसेच सदर घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




