वाई डीबीची दमदार कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोद )
गेले अनेक दिवस विजेच्या डीपी फोडून आतील तांब्याच्या तारा चोरणारी सहा जणांची टोळी वाई पोलिसांनी मोठ्या सीताफिने ताब्यात घेतली असून त्यातील तीन सराईत गुन्हेगार मलटण, ता. फलटण येथील असून दुसरे तिघेजन यशवंतनगर वाई येथील आहेत.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहुचर्चित रोहित्रामधील (डिपी) ताब्यांचे तारेची चोरी करणारे ६ आरोपी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक करुन त्यांचेकडुन १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेले काही दिवसापासुन रोहित्राचे (डिपी) नुकसान करुन त्यामधील ताब्यांच्या तारेच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या.
सदर घडत असलेल्या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी वाई पोलीस निरीक्षक यांना दिल्या होत्या. तपासात सदरचे संपुर्ण रोहित्र हे धोम कॅनॉलच्या कडेला असल्याने कॅनॉलच्या कडेला सीसीटीव्ही नसल्याने संपुर्ण तपासात अडचणी येत होत्या. वाई पोलीस तपास पथकातील अंमलदार विशाल शिंदे, हेमंत शिंदे यांचे तांत्रिक विश्लेषण व अंमलदार विक्रम धोत्रे, श्रावण राठोड यांचे बातमीदारांमार्फत आरोपींचा शोध घेतला
असता, हे यातील ३ आरोपी हे फलटण येथील असुन, त्यांना मदत करणारे ३ आरोपी हे
वाई येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार फलटण व वाई येथून एकुण ६
आरोपी यांना अटक करुन त्यांचेकडे अधिकचा तपास करुन आरोपी यांनी चोरी केलेला
मुद्देमालापैकी ३०० किलो ताब्यांची तार गुन्हयात वापरलेली २ दुचाकी व १ चारकचाकी वाहन तसेच आरोपींचे ५ मोबाईल असा एकुण १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी मुकेश माणिक जाधव( वय ४५ रा. मलठण, फलटण जि.सातारा), अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२ रा. मलठण, फलटण जि. सातारा), अर्जुन राजु जाधव (वय २० रा. मलठण, फलटण जि.सातारा), रोहन लाखन घाडगे ( वय २४ रा यशवंतनगर वाई जि. सातारा), विजय बाबुराव शिंदे (वय ३६ रा यशवंतनगर वाई जि. सातारा) मनोज नामदेव घाडगे (वय ४० रा यशवंतनगर वाई जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे असून
यातील फलटण येथील आरोपी सराईत गुन्हेगार असुन, त्यातील दोघांना जिल्ह्यामधुन तडीपार करण्यात आलेले आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक साो सातारा तुषार दोषी , अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर , उपविभागीय पोलीस अधिकारी वाई सुनील साळुंखे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाई जितेंद्र शहाणे , सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी , तपासपथकाचे
पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूज, पो. हवा अजित जाधव, पोलीस अंमलदार नितीन कदम, हेमंत
शिंदे, विक्रम धोत्रे, श्रवण राठोड, विशाल शिंदे, हेमंत लोलापोड, पोलीस पाटील संदेश
वैराट, जनार्दन गोळे यांचे पथकाने केली आहे.या कामगिरीबद्दल वाई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










