स्थानिक गुन्हे शाखा सातारा व लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीRemarkable performance of Lonand Police

 ७२ तासांत गुन्हा उघडकीस आणून चार आरोपींना अटक 

Remarkable performance of Lonand Police, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )

 दि १० फेब्रुवारी २०२६ खंडाळा तालुक्यातील सुखेड गावाच्या हद्दीत अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आलेला खून स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व लोणंद पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली आहे.

दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मौजे सुखेड (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील चोपडे वस्ती परिसरातील विहिरीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह, हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ०९/२०२६ दाखल करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक  तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली   लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट  दिली.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील साक्षीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयित कारचा शोध लावला. सलग तीन दिवसांच्या अहोरात्र परिश्रमानंतर हा खून कळंबोली येथून नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

तपासात असे उघड झाले की, मृत व्यक्तीचे नाव सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) असून, मुख्य आरोपीने मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इतर साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला. आरोपींनी सोमनाथला जबरदस्तीने होंडा सिटी कार (MH-12 DY 8846) मध्ये टाकून, दोरीने हातपाय बांधले, गळा आवळून खून केला व मृतदेह सुखेड येथे आणून पेट्रोल ओतून पेटवून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपींची नावे :

बंडू बापू भिसे (वय ४९), रा. कळंबोली, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण

विजय पोपटराव पवार (वय ३६), रा. साखरवाडी, ता. फलटण

किरण विकास गायकवाड (वय २७), मूळ रा. होळ, ता. फलटण, सध्या पुणे

श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५), मूळ रा. अंबड, जि. जालना, सध्या पुणे

सदर गुन्ह्यात घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे नसतानाही तपास कौशल्याच्या आधारे गुन्हा अवघ्या 72 तासात उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांनी  पथकाचे अभिनंदन केले आहे.‌

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !