उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत -श्रीरंग काटेकर.
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
स्पर्धात्मक युगात घडणारे बदल स्वीकारून विद्यार्थ्यांनी उद्योजकीय तंत्र कौशल्य आत्मसात करावीत असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ टीचर्स असोसिएशन व गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालय लिंब यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थीं विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी एम. बी. ए. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीप्ती बर्गे, डी.फार्मसी चे प्राचार्य विजय राजे, प्रा सविता मोरे आदि प्रमुख उपस्थित होते.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. दीप्ती बर्गे म्हणाल्या ,की व्यवस्थापकीय क्षेत्रातील ज्ञान घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे कौशल्याबरोबरच, विविध बिझनेस स्किल्स ,कृत्रीम बुद्धिमत्ता (A I.), संशोधन कौशल्य, तसेच सांखिकी ज्ञान असणे गरजेचे आहे.याच हेतूने या कार्यशाळेचे आयोजन गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालयात केले आहे.
एक सप्ताह आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे यासह वीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे. उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यशाळेत डॉ. प्रवीण जाधव सेक्रेटरी शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन,कोल्हापूर व डॉ. श्वेता मेथा चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली, या तज्ञांनी उद्योजकता तंत्र कौशल्य या वरती मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रा सविता मोरे यांनी केले.
केंद्र व राज्य सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल केले आहेत.स्किल बेस्ड एज्युकेशन या कार्यप्रणालीचा अभ्यासक्रमात समावेश केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
मदनराव जगताप, अध्यक्ष,गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा.धवन
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



