एनएसएस विशेष शिबिरात शेतीपूरक लघुउद्योग मार्गदर्शन – फळप्रक्रिया प्रशिक्षण वर्ग संपन्न

उपलब्ध फळांचा उपयोग करून उत्पन्नवाढ

NSS special camp, Chhatrapati Sambhaji Nagar, kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण

शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विशेष शिबिरांतर्गत दुसऱ्या दिवशी शेतीपूरक  लघुउद्योग या विषयांतर्गत  फळफळावळ व जाम-जेली निर्मिती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून श्री अशोक कदम (उप कृषी अधिकारी) तसेच श्री संतोष बक्षी (तज्ञ मार्गदर्शक, राज्यस्तरीय फळ प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर) यांनी विद्यार्थ्यांना व गावातील महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतीपूरक उद्योगांची संकल्पना, लघुवन व्यवस्थापन, मूल्यवर्धित उत्पादन निर्मिती तसेच जाम-जेली तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना तसेच गावातील महिलांना उद्योजकतेची दिशा दिली. स्थानिक पातळीवरील उपलब्ध फळांचा उपयोग करून उत्पन्नवाढ कशी साधता येईल यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. पवार (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख शिवाजी महाविद्यालय कन्नड) उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अन्न ही मानवाची गरज असून त्याच्याशी निगडित असलेले सर्व व्यवसाय हे कधीही बंद होणार नाहीत. अन्न उद्योग,व्यवसायात एकदम उडी न घेता हळूहळू लघुउद्योग सुरू करून प्रगती करावी. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी व्यवसायाभिमुख होणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योजकतेमध्ये नवनवीन संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी त्या संधींचा योग्य वेळी लाभ घ्यावा,” असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले, श्रीमती निर्मला पाटील मॅडम व श्री सचिन उपाध्ये सर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव, डॉ. सीमा काशीद, प्रा प्रगती चव्हाण, प्रा. मदन खुर्दे सर,ग्रंथपाल डॉ संतोष देशमुख आदी प्राध्यापक व गावातील 40 महिला यांनी उपस्थिती दर्शविली ,विशेष म्हणजे उपस्थित महिलांनी  स्वतः प्रशिक्षण घेऊन या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीपूरक उद्योगांविषयी जागरूकता निर्माण झाली असून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेवक यश पाटील याने  केले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय एनएसएस स्वयंसेविका अनुजा दाबके आणि मयुरी जाधव हिने केले आभार प्रदर्शन एनएसएस स्वयंसेविका साक्षी शिंदे हिने केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले.

    -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !