कातकरी बांधवांसाठी दिलासादायक पाऊल - ३४ लाभार्थ्यांना १७ गुंठे जमीन उपलब्ध

श्रमिक जनता विकास संस्थाचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे यांच्या पुढाकारातून स्वप्न साकार 

Landless Katkari brothers get their rightful place, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

‌जावली तालुका येथील श्रमिक जनता विकास संस्थाचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे यांच्या पुढाकारातून मेणवली (ता. वाई) येथे कातकरी समाजातील ३४ लाभार्थ्यांना शहरालगत प्रत्येकी अर्धा गुंठा याप्रमाणे एकूण १७ गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक भूमिहीन कुटुंबांच्या स्थिर निवाऱ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही जमीन खरेदी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्यास रुपये १ लाख प्रमाणे एकूण ३४ लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हा उपक्रम PM-JANMAN योजनेअंतर्गत राबविण्यात आला आहे.

भूमिहीन कातकरी बांधवांना हक्काची जागा मिळवून देण्याचा शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रत्यक्षात उतरला असून, सामाजिक न्यायाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या उपक्रमासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा श्रीमती याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रकल्प संचालक, डीआरडीए, जि. प. सातारा, विश्वास सिद ,  उपविभागीय अधिकारी, वाई योगेश खरमाटे, तहसीलदार, वाई सोनाली मेटकरी,  गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाई नारायण घोलप, नायब तहसीलदार, वाई वैभव पवार आणि  विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाई शाम राठोड यांचे सहकार्य लाभले.

याशिवाय मेणवली ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी वेदपाठक, उपसरपंच  संजय चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुचित्रा राऊत, मंडल अधिकारी  इंगवले, तलाठी  काकडे तसेच  कांताराम जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जमीन खरेदी व शासकीय प्रक्रिया सुरळीत पार पडली.

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कातकरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !