देशाने विकसनशील होण्यापेक्षा विकसित होणे गरजेचे आहे-डॉ मंगेश जाधव
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड : शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विशेष शिबिरांतर्गत तिसऱ्या दिवशी "विकसित भारत 2047" या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ.मंगेश जाधव सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग शिवाजी महाविद्यालय कन्नड विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांना सांगितले की, विकसित देशाच्या रांगेत बसण्यासाठी आपणास दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे, व ते वाढवण्यासाठी रोजगार वाढवणे गरजेचे आहे. 21 व्या शतकात प्रगत तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे त्याचबरोबर पर्यावरणाचा जो आज ऱ्हास होत आहे तो अगोदर थांबवने गरजेचे आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कवितांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी कन्नड तालुक्यातील प्रसिद्ध कवी श्री ज्ञानेश्वर गायके यांनी नोंद घेतो, तो हरवलाय, श्री राम दापके यांनी मैना, साजणी,श्री लक्ष्मण वालडे यांनी राजे, स्वप्न या समाजातील ज्वलंत प्रश्नावर आधारित कवितेचं सादरीकरण केले .
त्यानंतर एन एस एस स्वयंसेवक व स्वयंसेविका नागेश लाड, पूजा चव्हाण, यश पाटील जानवी गाडे,रोहित क्षीरसागर, यांनी देखिल उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला,तसेच संयोजन समितीचे प्रा सोमेश मोगरे यांनी गर्दीचा भाग,जात ,प्रा मदन खुर्दे यांनी तुझ्याच गावावरून , डॉ सीमा काशीद यांनी देखील , शून्यच आहे मी, ,ईत्यादी स्वरचित कविता सादर करून मैफिलीमध्ये रंगतआणली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.प्रगती चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना 2047 पर्यंत आपला भारत देश विकसनशील वरून विकसित कसा होईल याकडे जातीने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
या याप्रसंगी एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव,ग्रंथपाल डॉ संतोष देशमुख उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेविक कल्याणी सोनवणे हिने केले तर पाहुण्यांचा परिचय प्रेम दाबके याने केले आभार प्रदर्शन धनश्री पाटे हिने केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




