अभिजात आणि समृद्ध अशा मराठी भाषेचा आपण नेहमीच गौरव केला पाहिजे - प्रसिद्ध कवी पत्रकार सचिन कुलकर्णी

अनगरच्या कै. शंकरराव पाटील विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
Marathi language glory day, Solapur, Angar, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, अनगर (प्रतिनिधी सत्यवान दाढे)
"संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत अनेक संत महंत राष्ट्रपुरुष हे मराठी भाषिक होते त्यामुळे आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण तिचा गौरव केला पाहिजे", असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी पत्रकार सचिन कुलकर्णी यांनी केले. अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कवी कुसुमाग्रज तथा वि.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. "मराठी भाषा ही जगातील अभिजात भाषांपैकी एक असून अतिशय समृद्ध भाषा आहे, म्हणूनच आपण तिचा गौरव केला पाहिजे" असे पुढे बोलताना ते म्हणाले.

प्राचार्य महादेव चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कवी, आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी , उपमुख्याध्यापक माधव खरात पर्यवेक्षक राजेंद्र डोके, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सुरवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती, कवी कुसुमाग्रज व स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. 

पंढरपूर येथील प्रसिद्ध कवी व पत्रकार सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले यात परमेश्वर थिटे, अनुराधा गोडसे, अर्चना गुंड, प्राजक्ता देंडे, तात्या गायकवाड, व विद्यार्थ्यांनी सुंदर काव्यरचना सादर केल्या. प्रमुख पाहुणे सचिन कुलकर्णी यांच्या काव्य गायनाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री अनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी आधिकारी चंद्रकांत ढोले यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला बापूराव घुले, बजीरंग पाचपुंड, अमोल खताळ, अनुराधा गोडसे, प्राजक्ता देंडे, चंद्रकला उघडे, गीतांजली माळी, रेश्मा थिटे, अर्चना गुंड, रूपाली कदम, आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी नेटके सूत्रसंचालन केले तर बजीरंग पाचपुंड यांनी आभार मानले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !