धोम परिसरात प्रशासनाचा दरबार

 २८ फेब्रुवारीला रंगणार प्रश्नांचा 'मेगा कॅम्प'

Magnificent 'Mega Camp', Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरण आणि जांभळी बंधारा परिसरातील गावांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत सुविधांचे प्रश्न आणि वैयक्तिक समस्या मार्गी लावण्यासाठी शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नरसिंह हायस्कूल, धोम येथे एका भव्य ‘मेगा कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट (रेनावळे), जनसेवा फाउंडेशन आणि वाई पंचायत समितीच्या सदस्या वर्षा जगताप यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच छताखाली जिल्हा प्रशासनातील सुमारे ४० ते ४५ विभागांचे स्टॉल्स असणार आहेत. नागरिक आपले गावपातळीवरील प्रश्न, वैयक्तिक तक्रारी किंवा नवीन योजनांचे प्रस्ताव थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतील. विशेष म्हणजे, या अर्जांवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेशीर व प्रशासकीय पाठपुरावा केला जाणार आहे.

या महाशिबिराच्या पूर्वतयारीसाठी काल (रविवार, दि. १५) धोम आणि वरखडवाडी येथे विशेष बैठका पार पडल्या. या बैठकीला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.

शिबिरात काय मिळेल?

प्रलंबित प्रश्नांचे निराकरण: रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत निवेदने देता येतील.

शासकीय योजनांचा लाभ: विविध विभागांच्या योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ जागेवरच मिळण्याची सोय.

तक्रार निवारण: वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्तरावरील तक्रार अर्ज स्वीकारले जातील.

"आपल्या भागातील समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा मिळेलच असे नाही, त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने, बचत गटांनी आणि लोकप्रतिनिधींनी यात हिरहिरीने सहभागी व्हावे."

— वर्षा जगताप (सदस्या, पंचायत समिती, वाई)

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !