राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार ऋतुजा शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन गटातील महिलांना मूलभूत आरोग्य सुविधांसाठी आजही वाईसारख्या ठिकाणी जावे लागते, ही बाब अत्यंत वेदनादायक असून महिलांसाठी मोफत सोनोग्राफीसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे पहिले प्राधान्य राहील, असा ठाम निर्धार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजाताई शिंदे यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या की, बावधनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी तेथे अद्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत. विशेषतः सोनोग्राफीसारख्या आवश्यक तपासणीसाठी महिलांना खासगी रुग्णालयात जाऊन मोठा खर्च करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणे व तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल.
पंचायत समिती सदस्य म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात मर्यादित निधी असूनही शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी या भागात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिल्यास अधिक निधी उपलब्ध होणार असून विकासकामांना गती देता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच, कार्यक्षम नेतृत्वाखाली आणि आमदार मा. मकरंद आबा पाटील यांच्या निधीतून आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा व महिला सक्षमीकरणासह विविध विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासनही ऋतुजाताई शिंदे यांनी यावेळी दिले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



