गहाळ झालेला ४ लाखांचा सोन्याचा 'राणीहार' शोधून मूळ मालकास सुपूर्त

वाई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Commendable performance of the police, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळण्याची आशा मावळलेली असतानाच, वाई पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत एका तक्रारदाराचा तब्बल ४ लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना शोधून काढला आहे. पोलिसांनी हा दागिना मूळ मालकास सन्मानाने परत केल्याने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     तक्रारदार महेश अरविंद मोहिते यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी वाई पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्या पत्नीचा अडीच तोळ्याचा मौल्यवान 'राणीहार' कोठेतरी गहाळ झाला होता. या घटनेमुळे मोहिते कुटुंब चिंतेत होते.

     तक्रार प्राप्त होताच, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे यांनी अतिशय चिकाटीने आणि तांत्रिक बाबींचा वापर करून या गहाळ दागिन्याचा शोध घेतला.

     आज, २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हा दागिना महेश मोहिते यांना सुपूर्त केला. हक्काचा दागिना सुखरूप परत मिळाल्याने मोहिते यांनी आनंद व्यक्त केला असून, वाई पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदारांचे मनापासून आभार मानले आहेत.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !