काकासाहेब खळदकर यांचे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वडगाव रासाई येथे मा काकासाहेब खळदकर मा सरपंच सचिनदादा शेलार उपसरपंच अप्पासाहेब कोळपे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिरूर तालुका उपाध्यक्ष डॉ .सुजित शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी काकासाहेब खळदकर यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधाताना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी ज्ञान व कौशल्य सोबतच संस्काराची शिदोरी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले. शाळेने केलेले संस्कार जपत आपण मार्गक्रमण करत यशाची शिखरे पदाक्रांत करावीत असे मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य दिवे सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना शाळेची यशस्वी परंपरा प्रतिपादित केली. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सचिन दादांनी विद्यार्थांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाररांनी विद्यार्थ्यांनी पुढे आपल्या जीवनातं गगनभरारी घ्यावी असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
तसेच डॉ सुजित शेलार यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर आरोग्य जपत या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जात शाळेची यशाची परंपरा कायम राखत आपण एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या उभारणीत योगदान द्यावे. व शाळेने केलेले संस्कार आजीवन उपयोगात आणावेत असे सांगितले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील यशाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे सर व मेंडके सर यांनी केले. तर वर्गाशिक्षक वळवी सर, पोरे मॅडम व कुंभार सर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व श्री नंदकुमार मगर सर यांनी उपस्थित मान्यवारांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांडगे सर, पावरा सर, गोसावी सर, मेंगाळ सर, फुकट सर , झिंगाडे सर , गायकवाड सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





