भाविकांना भजन कीर्तन प्रवचन अशा श्रवणभक्तीची पर्वणी
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
श्री क्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील आजमेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवार (ता . १९ )ते गुरुवार (ता २६ ). रोजी संपन्न होणार असल्याची माहिती या सप्ताहाचे संयोजक व अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे सरचिटणीस पत्रकार मधुकर महाराज गायकवाड (आदर्श गावगावडेवाडी (ता आंबेगाव ) यांनी येथे ही माहिती दिली
या सप्ताहामध्ये पहाटे पाच ते सात काकड आरती सकाळी नऊ ते बारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी तीन ते पाच वाजता प्रवचन सायंकाळी पाच ते सहा वाजता हरिपाठ व रात्री साडेसात ते साडेनऊ वाजता वारकरी सांप्रदायिक श्रीहरी कीर्तने संपन्न होणार आहेत या सप्ताहात गणेश महाराज हिंगे (अवसरी बुद्रुक ) संतोष महाराज गावडे (आदर्श गाव गावडेवाडी )प्राचार्य डॉ .पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड (मंचर )संजीवनीताई गायकवाड / मंडलिक (लांडेवाडी )हेमलता नंदकुमार सोळवंडे /गायकवाड (काळेवाडी पुणे )) दिनांनाथ महाराज शिंदे (आदर्श गाव गावडेवाडी )रवींद्र महाराज कांबळे ( रामटेकडी पुणे ) नानासाहेब महाराज लोंढे ( राजगुरुनगर )संभाजी महाराज लोंढे (पुणे J किशोर महाराज उगले (गेवराई बीड) दीपक महाराज टेंभेकर (अवसरी खुर्द ) प्रा .पंढरीनाथ महाराज तांबे (अवसरी खुर्द ) धोंडीभाऊ महाराज शिंदे (अवसरी खुर्द ) नंदकिशोर महाराज लोंढे (धायरी पुणे ) यांची प्रवचने संपन्न होणार आहेत तर या सप्ताहात ह भ प बाळासाहेबमहाराज साळवे (मलठण ) अशोक महाराज हकाळे (गेवराईबीड )दत्तात्रय महाराज रुकारी (कोल्हारवाडीआंबेगाव पुणे )नामदेव महाराज वाळके वेळेश्वर मंदिर संस्थान कुरवंडी ह भ प गणेश महाराज ढगे गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था (पंढरपूर ) ह भ प आदिनाथ महाराज जुन्नरकर (खडकी पिंपळगाव J भीमाताई ज्ञानदेव लोंढे संगीत अलंकार (वारू ता मावळ ) यांची वारकरी सांप्रदायिक श्रीहरी कीर्तन ना संपन्न होणार आहेत या सप्ताहाची सांगता ह भ प मधुकर महाराज गायकवाड आदर्श गाव गावडेवाडी यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजता काल्याचे किर्तन होऊन दहीहंडी फोडून होणार आहे महाराष्ट्रातून या सप्ताहाला शेकडो वारकरी हजेरी लावणार आहेत व सर्व भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे पदाधिकारी अधिकारी व संयोजक पत्रकार मधुकर महाराज गायकवाड यांनी केले आहे
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




