निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी ( प्रतिनिधी गोविंद आढाव )
राहुरी तालुक्यातील कणगर येथे एक ७४ वर्षीय वयोवृद्ध इसम पाय घसरून तळ्यात पडले. आणि तळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १६ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
नारायण आनंदा लाहुंडे, वय ७४ वर्षे, रा कणगर, ता. राहुरी, असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मयत नारायण लाहूंडे हे नेहमी प्रमाणेच आज दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास देवी दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हे कणकावती देवी मंदिरा समोरील तळ्यात पाय घसरून पडले. काही ग्रामस्थांनी त्यांना ताबडतोब पाण्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. नारायण लाहूंडे यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मयत नारायण लाहुंडे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेने कनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



