वाई पालिकेची विशेष सभा हाऊसफुल्ल आणि हायटेक

पाचही विषयांना मिळाली एकमताने मंजुरी

First special meeting of the Wai Municipality, Satara , wai, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वाई नगरपरिषदेने कंबर कसली असून शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा. नगरपरिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली वाई पालिकेची पहिलीच विशेष सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, सभेचे कामकाज थेट डिजिटल स्क्रीनवर पालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रक्षेपित करण्यात आले होते, ज्यामुळे वाईकरांना सभेचा अनुभव घरबसल्या किंवा पालिकेबाहेरून घेता आला. नगराध्यक्षांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता असलेली ही सभा ऐतिहासिक निर्णयांनी गाजली.

न्यायालयासमोर शहर विकास योजनेअंतर्गत महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कृष्णा नदीच्या तीरावरील दुर्गंधी नष्ट करण्यासाठी दलदलीचे भाग बुजवणे, नाना-नानी पार्कमध्ये लेझर शो व सोलर लाईट बसवणे आणि परशुराम मंदिर परिसरात रॅम्प व पायऱ्या बांधण्याच्या कामांना हिरवा कंदील मिळाला. ही सर्व कामे हरित लवादाच्या नियमांचे पालन करूनच केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले. 

पालिकेच्या दोन शाळा आता इंग्रजी माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. तसेच शाळेच्या वेळेनंतर या इमारती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व अकॅडमी म्हणून उपलब्ध करून दिल्या जातील. शहरात नो-पार्किंग झोन, एकेरी वाहतूक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि बेशिस्त वाहने उचलण्यासाठी क्रेन व्हॅन घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. वाई शहराच्या हद्दवाढीसंदर्भात सभागृहात सकारात्मक चर्चा होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. असे सभेत महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आले.

हरित लवादाचा दंड आणि 'नदी सुधार'साठी निधी

सभेमध्ये हरित लवादाने केलेल्या २५ लाखांच्या दंडाबाबत चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली की, जरी पालिकेला हा दंड झाला असला तरी, तेवढ्याच रकमेचा निधी नदी सुधार योजनेसाठी लवादाकडून मंजूर करून घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

यावेळी सभागृहाच्या मान्यतेशिवाय एक रुपयाही खर्च होणार नाही. नगरसेवकांना सर्व कामांचे सविस्तर तपशील सभेपूर्वी दिले जातील, ही पारदर्शक कारभाराची सुरुवात असल्याचे वाई पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी स्पष्ट केले.

या सभेस उपाध्यक्ष घनशाम चक्के, ज्येष्ठ नगरसेवक भारत खामकर, संदीप जावळे, विजय ढेकाणे, प्रसाद बनकर, संग्राम पवार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि पालिकेचे विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !