राष्ट्रवादी (अजितदादा गट) मेळाव्यात मंत्री मकरंद आबा यांचे मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओझर्डे जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा प्रचंड उत्साहात व जल्लोषात पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)चे मंत्री मकरंद आबा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यात कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत मंत्री मकरंद आबा यांनी संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले. “संघटन हीच खरी ताकद असून कार्यकर्त्यांच्या कष्टावरच यशाची उभारणी होते. आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हीच पक्षाची खरी शक्ती आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून एकजुटीने काम करण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक बळकट झाला.
यावेळी प्रताप पवार, महादेव मस्कर, वृषाली चव्हाण, कांतीलाल पवार, विश्वजित पिसाळ, ज्ञानदेव कदम विजय पोळ, अक्षदा फरांदे, अजित चव्हाण, नवनाथ सोनटक्के, अनिल ठोंबरे, अविनाश चव्हाण, संदीप पिसाळ या जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रताप पवार, माजी सदस्य जि. प. शशिकांत पवार, किसन वीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सूतगिरणी संचालक श्रीकांत वीर, यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा वृषाली चव्हाण, पांडे सरपंच चेतना जाधव, उदयसिंह पिसाळ, ओझर्डे पंचायत समिती माजी सदस्य मधुकर भोसले,सातारा जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष महादेव मस्कर,
ओझर्डे जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते, सरपंच–उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने व सहभागाने हा मेळावा प्रेरणादायी व यशस्वी ठरला, असे त्यांनी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



