मीडियाच्या युगात सुद्धा महिलांनी संसार सांभाळून कर्तव्याचा उमटविला ठसा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती शिरूर संचलित आश्रम शाळा शैक्षणिक संकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सुनिता संतोष पोटे व सुनिता आनंद भुजबळ तसेच एडवोकेट प्रणिता जोशी, पोलीस कॉन्स्टेबल शोभा ससे व साक्षी पुंडे उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका गायकवाड सुहासिनी रमेश ह्या होत्या.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.सुनिता पोटे यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला आणि पुरुष कसे समान आहेत हे सांगताना सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मुला मुलींच्या जबाबदारी व कर्तव्य सांगितले. यावेळी बोलताना म्हणाले की ,अनेक महिलांनी राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक तसेच सध्याच्या तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या युगात सुद्धा महिलांनी आपला संसार व कुटुंब सांभाळत असताना आपल्या जबाबदारी व कर्तव्याचा ठसा सक्षमपणे समाजात उमटविला असून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये या महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक विविध उपक्रम राबवले पाहिजेत असे यावेळी बोलताना म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिरे मनीषा यांनी केले तर आभार ऋतुजा साळवे यांनी मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



