भाजप, राष्ट्रवादी मध्येच रंगणार निवडणुक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार गटासाठी ३६ अर्ज तर पंचायत समिती आठ गणासाठी ४५ उमेदवार रिंगणात असून एकूण अपक्षांसह ८१ अर्ज दाखल झाले आहेत. वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना (उद्धव/शिंदे गट) तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
बुधवार दि. २१ रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्ते, उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला होता. तसेच प्रत्येक पक्षाने उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून भरले. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची चुरस सुरू होती.
या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने अभेपुरी गण आणि भुईंज गटात जुनेच उमेदवार दिले आहेत. तर भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मागील निवडणुकांतील निकाल, सध्याची राजकीय समीकरणे आणि स्थानिक प्रश्नांमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवेळेस राष्ट्रवादीचे चारही जिल्हा परिषद गटात उमेदवार निवडून आले तर बावधन गणात काँग्रेस उमेदवार निवडून आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होती. परंतु सध्या राजकीय गणित बदलली असल्याने यावेळी शेवट पर्यन्त वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय संख्या असल्याने अनेक मतदारसंघांत ते निर्णायक भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता उमेदवारी अर्ज छाननी, माघारी आणि चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग येणार असून, वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षामुळे अधिक रंगतदार ठरणार आहे.
जिल्हा परिषद गट यशवंत नगर (सर्वसाधारण)
चंद्रकांत धोंडीबा शेलार, आनंदा रामचंद्र शिवले, दिनकर महादेव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस, विठ्ठल सखाराम कदम अपक्ष, रोहित मारुती वाडकर भाजपा, अशोक तुकाराम वाडकर अपक्ष, आनंदा शंकर चिरकुटे अपक्ष
बावधन गट (सर्वसाधारण महिला)
ऋतुजा विराज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस, दीप्ती शशिकांत पिसाळ भाजप, कामिनी मदन भोसले अपक्ष धनश्री दीपक मालुसरे
सर्वसाधारण महिला गट
चेतना किरण जाधव अपक्ष, दिपाली सागर जाधव अपक्ष, ज्योत्स्ना वसंत गायकवाड अपक्ष, भारती संजय जगताप उभाठा, वृषाली ललित चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पना प्रताप यादव भाजप,
ना. मा. प. भुईंज
दिलीप न्यानोबा बाबर भाजप, प्रमोद भानुदास शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस, नितीन सूर्यकांत विसापुरे शिवसेना उभाठा
पंचायत समिती गणचे नाव अभेपुरी सर्वसाधारण
अशोक नारायण मांढरे भाजप, रवींद्र मानसिंग भिलारे शिवसेना, विक्रांत विठ्ठल डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस, भाऊसाहेब सूर्यकांत सपकाळ अपक्ष, दीपक विष्णू काकडे अपक्ष, कृष्णा भागोजी नवघणे अपक्ष, विजय शांताराम येवले अपक्ष, तुळशीदास मारुती वाडकर अपक्ष, आनंदा रामचंद्र वाशिवले अपक्ष, नारायण महादेव मांढरे अपक्ष, सागर तुकाराम सणस अपक्ष,
यशवंत नगर गण एस सी
सौरभ संजय पवार अपक्ष, सुरत संजय पवार काँग्रेस, स्वप्नील अशोक गायकवाड भाजप,संजय गंगाराम कांबळे अपक्ष,साक्षी सचिन वायदंडे अपक्ष, हेमलता अशोक गायकवाड अपक्ष, संजय भिकू कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस
शेदुरजणे गण सर्वसाधारण
वर्षा लालसिंग जगताप राष्ट्रवादी काँग्रेस,अनिता युवराज कोंढाळकर भाजप, रूपाली तेजस गाढवे अपक्ष, प्रज्ञा सुरज कासुर्डे शिवसेना उभाठा, नंदा अशोक नवघणे काँग्रेस,
बावधन गण सर्वसाधारण
अक्षय रामराव मांढरे संतोष यादवराव पिसाळ विक्रम सदाशिव पिसाळ राष्ट्रवादी काँग्रेस, सचिन आप्पासाहेब भोसले भाजप, अजय विलास पिसाळ अपक्ष, काशिनाथ आनंदा पिसाळ अपक्ष,
केंजळ ना.मा.प्र
रेखा जितेंद्र जाधव शिवसेना शिंदे, दीपक शिवाजी पवार भाजप, प्रदीप कृष्णा शिरसागर अपक्ष, शैला नामदेव सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस
ओझर्डे ना.मा.प्र. महिला
हर्षदा सुधीर फरांदे राष्ट्रवादी काँग्रेस,
अंकिता अभिजीत फरांदे भाजप,
भुईंज सर्वसाधारण महिला
सुरभी मदन भोसले भाजप,कोमल अभिजीत जाधव अपक्ष, शितल प्रमोद वारागडे राष्ट्रवादी काँग्रेस
पाचवड सर्वसाधारण महिला
वनिता संतोष शिंदे भाजप, राणी कांतीलाल पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उज्वला धनाजी बाबर शिवसेना उबाठा
जिल्हा परिषद निवडणूक विभाग एकूण 36 पंचायत समिती निर्वाचक
गण एकूण 45 एकूण 81
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



