संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेत रस्ता
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
शिव पानंद शेतरस्ता चळवळीने वेळोवेळी आंदोलन, निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष कायदा मंजूर केला. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वेळोवेळी शेतकरी एकत्र जमवून महसूल विभागाला निवेदन देऊन ही चळवळ जागृत ठेवण्याचे काम शिवानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे साहेब व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले साहेब हे करत आहेत.
वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगाव येथील शेतकरी श्री भाऊसाहेब मोईन यांची गट क्रमांक ७७ मध्ये एकूण ८ एकर जमीन आहे. गट क्रमांक ७७ मध्ये जाण्यासाठी ७६ मधील शेतकऱ्यांनी ३ वर्षापासून बंद केला होता.
या शेत रस्त्याचे प्रकरण वैजापूर तहसील येथे होते. श्री शरद पवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व श्री दादासाहेब जंगले पाटील यांच्या सहकार्याने भाऊसाहेब मोईन यांचा शेत रस्ता खुला करण्यात आला. वैजापूर तालुक्यातील शिवपानंद शेत रस्ता चळवळीचा हा पहिला प्रयत्न आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी स्पॉटवर जाऊन पाहणी केली व रस्ता खुला केल्यानंतर पंचनामा केला.
यावेळी पोलीस स्टेशन विरगाव येथील बीट अंमलदार श्री मनोज कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल पूजा मतसागर, मंडळ अधिकारी श्रीमती. ए. एस. विभुते, तलाठी जि. आर. सुरकुटलावार, पठाण आप्पा, पोलीस पाटील श्रीमती हिराबाई दहिटे, शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे वैजापूर तालुक्यातील कृती समितीचे सदस्य श्री अनिल सूर्यवंशी, सह्याद्रीचा राखणदार व जनता आवाज या न्युजचे प्रतिनिधी श्री अर्जुन शिंदे, रवींद्र मोईन, तुळशीराम मोईन, योगेश मोईन, साईनाथ मोईन, प्रवीण मोईन इतर शेतकरी शेत रस्ता स्थळी हजर होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



