रमेश उबाळे यांची मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा शहरात असलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा याचा खर्च नगरपरीषदेने करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी सर्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली.
मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले हे नुकतेच सातारा येथे आले असता रमेश उबाळे यांनी त्यांची भेट घेत विविध मागण्या केल्या.
रमेश उबाळे म्हणाले, सातारा शहरात रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषाचे पुतळे आहेत. महापुरुषाच्या विचाराने आज देशाची, राज्याची वाटचाल सुरू असून शहरात असलेल्या सर्व म्हपुरुषाच्या पुतळ्याला दररोज ताज्या फुलांचा पुष्पहार अर्पण केला पाहिजे याचा सर्व खर्च नगरपरीषदेने केला पाहिजे.
यांचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या खोलीमध्ये शैक्षणिक अभ्यासिका सुरू करावी. एमपीएससी, युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिकेचा उपयोग होईल. यासाठी नगरपरीषदेने पुढाकार घेतला पाहिजे असे मत रमेश उबाळे यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचेपुढे मांडले. दरम्यान तुम्ही सुरुचीवर या आपण सर्व मागण्याचा विचार करुन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रमेश उबाळे यांना दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा महासचिव नितिन रोकडे महिला जिल्हाध्यक्ष पद्मा सुतार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा धोत्रे,तालुकाध्यक्ष दीपक गाडे, शहराध्यक्ष गौतम रणदिवे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गायकवाड उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



