पत्रकारितेतील योगदानाचा गौरव - प्रगती हिंदुस्तान दिनदर्शिकेचेही प्रकाशन
शिवशाही वृत्तसेवा, (वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार आणि अजिंक्यतारा साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख महेंद्र जाधव (आबासाहेब) यांना 'आदर्श कार्य गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेंद्रे येथील स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनातील व्यवस्थापकीय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
'प्रगती हिंदुस्तानचे' सहसंपादक विनोद गायकवाड आणि कराडचे पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते महेंद्र जाधव यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अजिंक्यतारा कामगार पतसंस्थेचे व्यवस्थापक संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेंद्र जाधव यांच्या पत्रकारितेतील समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात संस्थेच्या ‘प्रगती हिंदुस्तान’ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
"आज ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनने माझा जो सन्मान केला, तो केवळ माझा नसून मी आजवर प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारितेचा आणि मूल्यांचा सन्मान आहे. स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज आणि ना.श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना समाजसेवेची जी शिकवण मिळाली, तीच मी माझ्या लेखणीतून उतरवली. पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे एक प्रभावी साधन आहे. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जबाबदारीने आणि निष्ठेने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल. मला या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व भुईंज प्रेस क्लब यांचे मी मनापासून आभार मानतो." अशी कृतार्थ भावना पुरस्कारार्थी महेंद्रआबा जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



